Type Here to Get Search Results !

जवळार्जुन विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी महेश राणे तर व्हा चेअरमनपदी नवनाथ राणे

 जवळार्जुन विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी महेश राणे तर व्हा चेअरमनपदी नवनाथ राणे यांची बिनविरोध निवड



सासवड दि.१४


      पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन येथील जवळार्जुन  विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी महेश राणे तर व्हा चेअरमन लपदी नवनाथ राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आज दिनांक १४ मार्च रोजी सासवड येथील  एआर ऑफिस मध्ये ही निवडणूक प्रक्रिया पारपडली.


     या सोसायटीच्या संचालकपदाच्या निवडणुकीत पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या कॉंग्रेस पुरस्कृत  पॅनेलचे  दहा उमेदवार निवडून आले होते. तर तीन विरोधात विरोधी पॅनलचे उमेदवार निवडून आले होते. काँग्रेस पुरस्कृत पॅनलकडे बहुमत असल्याने  व आज महेश राणे आणि नवनाथ राणे यांचे चेअरमन चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अमरीन बागवान यांनी जाहीर केले त्यांना संस्थेचे सचिव हनीफ सय्यद यांनी सहकार्य केले 



         यावेळी सोसायटीचे नवनिर्वाचित सदस्य महादेव कोंडे, दिलीप निंबाळकर, जालिंदर टेकवडे, सुमित टेकवडे, मामा गुळूमकर, यशोदा साळुंखे, विमल राणे, प्रदीप खोमणे, महेश रोकडे, प्रशांत राणे, महादेव पवार इत्यादी उपस्थित होते. निवडीनंतर ग्रामस्थांच्यावतीने आप्पासाहेब उर्फ माऊलीनाना राणे यांच्या हस्ते नवनिर्वाचित चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी हनुशेठ टेकवडे व बापूराव राणे इत्यादी उपस्थित होते.

निवडीनंतर बोलताना महेश राणे म्हणाले की, सहकार महर्षी स्वर्गीय चंदूकाका जगताप यांनी सहकाराचे जे स्वप्न पाहिले होते ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तळागळातील शेतकऱ्याला या सोसायटीला लाभ झाला पाहिजे हे काकांचे स्वप्न होते. ते स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies