या गावात येथे विहिरीवरील तोडलेले वीज कनेक्शन जोडण्यावरून महिला व तिच्या कुटुंबीयांना मारहाण ; सासवड पोलिसात फिर्याद दाखल

 या गावात येथे विहिरीवरील तोडलेले वीज कनेक्शन जोडण्यावरून महिला व तिच्या कुटुंबीयांना मारहाण ; सासवड पोलिसात फिर्याद दाखल



सासवड दि.९


          पुरंदर तालुक्यातील गरडे येथे विहिरी वरील वीज वितरणाने तोडलेले कनेक्शन पुन्हा का जोडतो? असे विचारल्यावर १० जणांच्या टोळक्याने महिलेस मारहाण केली आहे.या प्रकरणी सासवड पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 143,147,149,354,323,504,506 नुसार गुन्हा दाखल केला आहे .

      याबाबत सासवड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,याबाबतची फिर्याद गाराडे येथील २६ वर्षीय महिलेने दिली आहे. तिने दिलेल्या तक्रारी नुसार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजलेच्या सुमारास आरोपीनी फिर्यादीच्या सामाईक विहिरीवर वीज वितरणाचे तोडलेले वीज कनेक्शन पुन्हा जोडत होते.तयावेळी फिर्यादी व त्यांच्या पतीने हे कनेक्शन जोडू नका असे सांगितले.यावरून त्यांना आरोपी- 1)चंद्रकांत रघुनाथ जगदाळे 2) स्वप्नील चंद्रकांत जगदाळे 3) संतोष विठ्ठल जगदाळे 4) लक्ष्मण दत्तात्रय जगदाळे 5) दिपक शंकर जगदाळे 6) प्रशांत सुनिल जगदाळे 7)अक्षय रामदास जगदाळे 8)मयुर सुनिल जगदाळे 9) गोरख रघुनाथ जगदाळे 10) रोषन नवनाथ जगदाळे सर्व रा. गराडे मठवाडी ता पुरंदर जि पुणे यानी मारहाण केली. तर यातील 1 ते 4 यांनी फिर्यादी व भांडणे सोडविण्यास आलेल्या इतर तीन महिलांचे यांचे हात धरुन वाईट हेतुन झंप्पर फाडले. व तुम्हाला माज आला आहे. असे म्हणुन त्यांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले व हाताने मारहाण करुन शिविगाळ दमदाटी केली.तसेच आरोपी क्रमांक 5 ते 10 यांनीही फिर्यादी ,तिचे पती , चुलत सासरे यांना हाताने मारहाण करुन शिविगाळ दमदाटी केली. याबाबतची फिर्याद सासवड पोलिसात देण्यात आली आहे.याबाबतचं अधिकचा तपास

 सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार काळभोर करीत आहेत.






Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..