शिवसेनेच्या दिवे गराडे विभागप्रमुखपदी विशाल रावडे. तर शाखाप्रमुखपदी संजय जगदाळे
सासवड दि.
शिवसेनेच्या दिवे गराडे जिल्हा परिषद गटाच्या विभागप्रमुख पदी विशाल रावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. रावडे हे गराडे येथील रावडेवाडीचे रहिवासी असून माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे ते समर्थक समजले जातात. त्यांच्या सोबतच गराडे गावच्या शाखाप्रमुख पदी श्री. संजय जगदाळे यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप यादव यांनी दिली आहे
माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते दोनही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. शिवसेनेच्या विद्यार्थी सेनेचा मेळावा आज सासवड येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी या नियुक्त्यांची घोषणा श्री. यादव यांनी केली. युवासेनेचे जिल्हाप्रमुख उमेश गायकवाड, महिला आघाडीच्या जिल्हा समन्वयक गीतांजली ढोणे, युवासेनेचे तालुकाध्यक्ष मंदार गिरमे, राजाराम झेंडे आदींनी श्री. रावडे व श्री. जगदाळे यांचे अभिनंदन
पश्चिम भागात नामदार शिवतारे यांच्या माध्यमातुन झालेली प्रचंड विकासकामे आणि पक्षाची ध्येयधोरणे सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम करणार असल्याचे श्री. विशाल रावडे यांनी सांगितले. तर श्री. संजय जगदाळे म्हणाले, गराडे हे पश्चिम भागातील सर्वात मोठे गाव आहे. गावच्या शाखाप्रमुख पदाचा बहुमान मिळाला असला तरी पक्षाने ठेवलेला विश्वास सार्थ करून गावात शिवसेना वाढवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहे.