लग्नाचे आमिष दाखवून मुलींची फसवणूक करणारा भामटा पोलिसांच्या जाळ्यात
बारामती दि.१०
मला आई वडील नाही. मी एकटा आहे. मला सरकारी
नोकरी आहे. व मी अविवाहित आहे .असे सांगून मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची
फसवणूक करणाऱ्या भामट्याला बारामती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अजय कुमार
नंदकुमार चटौला असे या आरोपीचे नाव असून रुई येथील शासकीय रुग्णालयात स्वीपर
म्हणून कार्यरत आहे. व तो विवाहित आहे. मात्र तो अविवाहित असल्याचे भासवून शादी
डॉट कॉम वर लग्नासाठी रिक्वेस्ट पाठवत होता. स्वतःला सरकारी नोकरी असल्याचे भासवून
मुलींना आपल्या जाळ्यात ओढायचा व त्यांच्याशी मैत्री करायचा. तसेच तो मुलीच्या
कुटुंबियांना भेटून त्यांचा विश्वास संपादन करायचा. व मुलींना पर्यटनाला घेऊन जात
त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा.
बारामती तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे यांना माहिती मिळाली की, सदर आरोपीने पुण्यातील एका महिलेला फसवणूक करून तिला भोर येथे एका रूम वर ठेवले आहे . त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे,पो.काँ. मंगेश कांबळे, दत्तात्रय मदने, चालक तुषार लोंढे यांनी केली.