Type Here to Get Search Results !

सासवडच्या बाजारपेठेत महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे गंठण चोरणारा चोरटा जेरबंद

 सासवडच्या बाजारपेठेत महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे गंठण चोरणारा  चोरटा  जेरबंद 



 स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई  दमदार कारवाई 


  सासवड प्रतिनिधी दि.२०


          सासवडच्या बाजारपेठेत महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे गंठण चोरणारा  चोरटा  जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

  दि १६/४/२०२२ रोजी सासवड पोलिस स्टेशन हद्दीत चांदणी चौक येथे  फिर्यादी  मंगल राजेंद्र हाडके वय ५० वर्षे रा सासवड . यांचे गळ्यातील २५ ग्राम वजनाचे मंगळसूत्र मोटार सायकल वरून आलेल्या २ अज्ञात इसमानी हिसका मारून जबरी चोरी करून नेले होते.सदर बाबत सासवड पोलिस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल धिरज जाधव यांना गोपनीय बातमीदरा मार्फत  माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा वढू गाव येथिल रोहित मन्नावत व त्याचे साथीदाराने KTM गाडी वापरून केल्याचे समजले.  त्यावरून  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वढू गावचौक  येथे सापळा रचून KTM गाडी वरून एक इसमास ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव रोहित किशोर मन्नावत वय १८ वर्षे रा वढू बुद्रुक असे.सांगितले त्याचे कडे मिळालेली KTM कंपनीची मोटार सायकल ही सासवड येथील गुन्हा करताना वापरली असल्याचे सांगितले. त्याची KTM कंपनीची मोटारसायकलसह ताब्यात घेऊन पुढील तपास केला असता . त्याने व त्याचा साथीदार याने सासवड येथील गुन्हा केल्याचे कबूल केले असल्याचे सांगितले आहे. या आरोपीस पुढील तपास कामी सासवड पोलिस स्टेशनच्या  ताब्यात दिले आहे.

  

     सदरची कारवाई ही  पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते उपअधिक्षक धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे  वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके ,पो.उपनिरीक्षक शिवाजी ननवरे,पो. हवा.अतुल डेरे, पो. ना. अमोल शेडगे ,पो. ना. बाळासाहेब खडके ,पो. कॉ. धिरज जाधव ,पो. कॉ. दगडू विरकर, म. पो. कॉ. पूनम गुंड तसेच सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक गणेश पोटे  यांनी केली  आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies