बाजार समितीचा सचिव 50 हजारांची लाच घेताना सापडला


 सातारा | गाळा भाड्याने देण्याकरिता मागितलेली लाच स्वीकारताना माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा सचिव हा लाचलुचपतच्या सापळ्यात सापडला आहे. रमेश रामभाऊ जगदाळे (वय ५६, रा.

राणंद, ता. माण) असे त्याचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी, कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार म्हसवड येथील गाळा भाड्याने मिळावा, यासाठी तक्रारदाराने सचिव रमेश जगदाळे यांच्याकडे मागणी केली होती. गाळा भाड्याने देण्याकरिता रमेश जगदाळे यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रार प्राप्त झाल्यावर लाचलुचपत विभागाकडून आज सापळा लावण्यात आला. या सापळ्यात लाच रक्कम स्वीकारताना रमेश जगदाळे अलगद सापडला.

पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्याचे पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिस निरीक्षक सचिन राऊत, पोलिस नाईक विनोद राजे व संभाजी काटकर यांनी सहभाग घेतला.

 

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?