हिमाचल प्रदेशला 'सफरचंद'मुळे जगभरात 'अॅपल राज्य' म्हणून ओळख मिळवून दिली आहे.
तसेच याच सफरचंदामुळे शिमला जिल्ह्यातील चौपालच्या मडावग गावाला आशियातील
सर्वात श्रीमंत गाव बनले आहे.
मडावगमधील प्रत्येक सफरचंद शेती करणारे कुटुंब करोडपती झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मडावगमधील प्रत्येक
कुटुंबाचे सरासरी वार्षिक उत्पन्न ३५ लाख ते ८० लाखांच्या दरम्यान आहे. सफरचंद पीक
आणि दर यावर उत्पन्नात वाढ किंवा घट अवलंबून असते. मडावगमध्ये २२५हून अधिक कुटुंबे
आहेत. येथील फळबागधारक दरवर्षी सरासरी १५० ते १७५ कोटी रुपयांची सफरचंद विकत आहेत.
क्यारी हे सर्वात श्रीमंत
गाव होते-
मडावगपूर्वी शिमला जिल्ह्यातील क्यारी गाव सर्वात श्रीमंत होते. क्यारी हे
सफरचंदांमुळे आशियातील सर्वात श्रीमंत गाव बनले होते. आता मडावग हे आशियातील
सर्वात श्रीमंत गाव असल्याचे म्हटले जाते.
आता दाशोली गाव उदयास येऊ लागले-
आता मडावगमधील दाशोली गाव देखील सफरचंदांसाठी राज्यात ठसा उमटवत आहे. दशोली
गावातील १२ ते १३ कुटुंबांनी देशातील सर्वोत्तम दर्जाच्या सफरचंदांचे उत्पादन सुरू
केले आहे. दशोलीचा छोटा बागायतदारही ७०० ते १००० पेटी सफरचंद तयार करत असून मोठा
बागायतदार १२ हजार ते १५ हजार पेटी सफरचंद तयार करत आहे.
८००० फूट उंचीवर सफरचंदाच्या बागा-
दाशोलीतील बागायतदारांच्या बागा ८००० ते ८५०० फूट उंचीवर आहेत. सफरचंद
लागवडीसाठी ही उंची सर्वोत्तम मानली जाते.
शिमल्यापासून मडावग ९० किलोमीटर अंतरावर-
शिमला जिल्ह्यातील चौपाल तहसील अंतर्गत मदावग गाव येते. हे शिमल्यापासून ९०
किमी अंतरावर आहे. गावाची लोकसंख्या २२०० पेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते.
मडावगमध्ये सर्वांनी आलिशान घरे बांधली आहेत. सफरचंद लागवडीसाठी अद्ययावत
तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
जम्मू काश्मीरच्या सफरचंदांनाही मागे टाकले-
मडावग गाव आणि संपूर्ण पंचायत सफरचंद लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. पण, मडावगच्या दाशोलीचे सफरचंद दर्जेदार किन्नोर आणि जम्मू काश्मीरच्या
सफरचंदांनाही मागे टाकत आहे. त्यामुळे मडावग आणि दशोलीची सफरचंद राज्यातील आणि
देशातील इतर भागातील बाजारपेठांमध्ये हातोहात विकली जाते. मडावगचे सफरचंदला
परदेशातही खूप मागणी आहे.