अल्पवयीन मुलीचा विनयभंग पोस्को व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा दाखल

 सासवड येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग पोस्को व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक   कायद्या नुसार गुन्हा दाखल



 सासवड दि. ३

  

  पुरंदर तालुक्यातील सासवड येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला जबरदस्ती फिरायला घेऊन जाऊन तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. त्याचबरोबर तिच्या घरच्या लोकांना संबंधित व्यक्ती आणि त्याच्या इतर मित्रांनी धक्काबुक्की, दमदाटी केल्या प्रकरणी सासवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी सासवड पोलिसांनी चार तरुणांच्या विरोधात भा.द.वि.क. 363, 354, 323,34 अनुसुचित जाती जमाती  अत्याचार प्रतिबंध कायदा कलम3(1),(R)(S),3(1),(W)(i),बाललैंगिक अत्याचार कायदा 2012(पोक्सो)कलम 8 प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


   या प्रकरणी सासवड येथे राहणारे आरोपी 1)पियुष जगताप  2) मल्हार झुंजार 3) तुषार जाधव 4) प्रथमेश जगताप व इत 4 ते 5 जणांच्या विरोधात गुन्हा दखल.करण्यात आला आहे. दिनांक 1 मे रोजी यातील आरोपी  मल्हार  झुंजार हा  या पिढीत मुलीला अम्रुसाई मंदिर सोनोरी रोड येथे घेवुन गेला व तिथे तिचा विनय भंग केला .त्याच बरोबर दिनांक 2 , मे रोजी यातील आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटूंबियांना  हाडको येथे बोलावून दमदाटी केली. तसेच धक्का बुक्की करूनं जातीवाचक शिवीगाळ केली. या बाबतची फिर्याद दिनांक 2 मे रोजी   पोलिसात देण्यात आली असून  उपविभागीय पोलीस अधिकारी याबाबतचा तपास करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..