पुरंदरकरांनो सावधान..!! कोरोना पुन्हा आला तालुक्यात
सासवड दि.४
गेली अनेक दिवसापासून कोरोना मुक्त झालेल्या पुरंदर मध्ये आता कोरोणाने पुन्हा आगमन केले आहे.सासवड शहरातील एका रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुरंदरकरांची चिंता वाढली आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड येथील चार रुग्णांची कोरोना चाचणी आज दिनांक ४ जून रोजी ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आली होती. यामधील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव आला आहे. त्यामुळे आता पुरंदर तालुक्यात कोरोनाने पुन्हा इंट्री केल्याचे स्पष्ट झाले आहे पाठीमागील काळात पुरंदरकरांनी कोरोना विरोधात जोरदार लढा दिला होता. आता पुन्हा एकदा कोरोना तालुक्यात पसरू नये म्हणून लोकांना काळजी घ्यावी लागणार आहे. राज्य सरकारने लोकांना कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. त्यामुळे लोकांना आता गर्दीच्या ठिकाणी जाताना सोशल डिस्टन्सचा वापर व मस्कचा वापर इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्यावे लागणार आहे. त्याचबरोबर गर्दीचे कार्यक्रम करू नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. जून जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये यामध्ये कोरोना रुग्णात वाढ होण्याचा अंदाज तज्ञांकडून वर्तवला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता पुरंदर मध्ये आलेल्या एका रुग्णाने चिंता वाढली आहे.
या बाबतची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.