Type Here to Get Search Results !

सासवड दुहेरी हत्याकांड संबंधितांचे कॉल रेकॉर्ड्स तपासा विजय शिवतारेंची मागणी

 सासवड दुहेरी हत्याकांड संबंधितांचे कॉल रेकॉर्ड्स तपासा

विजय शिवतारेंची मागणी




सासवड येथील दुहेरी हत्याकांडतील संबंधितांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासा माजीमंत्री विजय शिवतारे यांनी मागणी


 सासवड दि.१


       सासवड येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात सहभागी लोकांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणींमाजी मंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे. या बाबत आज शिवतारे यांनी सासवड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यामध्ये त्यांनी विद्यमान आमदारांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख आणि हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांनी यांच्या तत्परतेने खुनाला वाचा फुटली. आसा त्यांनी म्हटलंय तर सासवडचा बिहार झाला असून या प्रकरणात आमदार, त्यांचा एक सहकारी, सासवडचे पोलीस आणि ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर्स यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासायला हवेत असे शिवतारे यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटले आहे.


    दरम्यान शिवतारे यांचे हे आरोप आमदार संजय जगताप यांनी फेटाळून लावले आहेत. पोलीस यंत्रणा त्यांचे काम करते आहे. त्यांनी काय काम करावे कसे करावे हे माजी मंत्र्यांप्रमाने मी सांगत नाही.पोलिसांना जे दिसले त्या प्रमाणे त्यांनी कारवाई केली.पोलिसांनी संबंधितावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.याउलट शिवतारे यांच्या काळात तालुक्यात दीडशे रिव्हॉल्वर चे परवाने आले.आणि त्यांच्याच काळात अनेक खून दडपले . तालुक्यात कायदा व सुव्यवस्था असून ती बिघडवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असे त्यांनी म्हटले आहे .

  दरम्यान या घटने बाबत शिवतारे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.ते पोलीस प्रशासनाच्या कार्य प्रणालीवर संशय व्यक्त करीत आहे.


१) अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्याची घाई का केली?


२) ३६ तास माणूस रस्त्याच्या कडेला तडफडत असताना ग्रामीण रुग्णालयाने रुग्णवाहिका पाठविण्यास नकार का दिला?


३) शवविच्छेदन अहवालात शरीरावरील जखमांचा उल्लेख डॉक्टरने कुणाच्या दबावाखाली टाळला?


४) जेजुरीला फ्रीझर असताना मृतदेह फ्रीझरमध्ये ठेऊन त्याची ओळख का पटवण्यात आली नाही?


५) अवघ्या २४ तासात सासवड नगरपालिकेने मृतदेह जाळून का टाकला?



   एकंदरीतच सासवड येथील खून प्रकरण नंतर पुरंदर मधील राजकीय वातावरण गरम झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies