पोलिसांच्या क्रिकेट संघाचा पत्रकार संघावर विजय

 पोलिसांच्या संघाचा पत्रकार संघावर विजय


डीवायएसपी  धनंजय पाटील ठरले मॅच विन



वाल्हे.


      वाल्हे तालुका पुरंदर येथे सुरू असलेल्या "भैय्यासाहेब खाटपे चषक 2022" या क्रिकेट सामन्यामध्ये सुरवातीच्या सामन्यात पोलीस संघाने पत्रकार संघावर विजय मिळवला आहे.पोलीस आणि पत्रकार यांच्यात हा मैत्रीपूर्ण सामना झाला.



      वाल्हे येथे काल भोर उपविभागात पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या शुभ हस्ते "भैय्यासाहेब खाटपे चषक 2022" या क्रिकेट सामन्याचा शुभारंभ करण्यात आला.पुढील सहा दिवस हे सामने चालणार आहेत.जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष व आयोजक यांच्या  उपस्थितीत हा  शुभारंभ करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती  दत्ताजी चव्हाण,माजी सदस्य विराज काकडे, वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले,राजेश चव्हाण,माणिकराव चोरमले ,राजेंद्र  बराकडे,संदेश पवार, माजी सरपंच दत्तात्रय पवार, महादेव चव्हाण, माजी तंटामुक्ती अध्यक्ष सत्यवान सूर्यवंशी, माजी उपसरपंच सुर्यकांत भुजबळ, डॉ.रोहिदास पवार,  सामाजिक कार्यकर्ते सुजित राऊत, अनिल भुजबळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस दादासाहेब मदने, शिरीष नवले,दादा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.



   यावेळी पोलीस आणि पत्रकार यांच्या मध्ये सहा शटकांचा  सामना खेळविण्यात आला.यामध्ये पोलीस पोलीस संचाने पत्रकार संघावर विजय मिळवला.यावेळी भोर उपविभागात पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांना  मॅन ऑफ द मॅच  देण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.