नीरा येथील १० वीच्या परीक्षा केंद्रावर ग्रामस्थांनी यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत.

 नीरा येथील १० वीच्या परीक्षा केंद्रावर ग्रामस्थांनी  यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत. 



निर्भयपने, विनाकॉपी पेपर लिहिण्याचा दिला संदेश 

नीरा दि. १५


       नीरा (ता.पुरंदर) येथील  १०  विच्या परीक्षा केंद्रावर निरा येथील ग्रामस्थांनी  १० वीच्या  विद्यार्थ्यांचे  गुलाब पुष्प बदेऊन स्वागत केले. दोन वर्षानंतर  विध्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला  सामोरे जात आहेत.त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या शंका मनात न ठेवता विद्यार्थ्यांनी निर्भयपने व गैरमार्गाचा वापर नकरता परीक्षा द्यावी असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण यांनी यावेळी केले.



   नीरा येथील महात्मा गांधी विद्यालय  या  ठिकाणी असलेल्या  परीक्षा केंद्रावर १०३ विध्यार्थी परीक्षा देत आहेत.तर सौ.लीलावती  रिखावलाल शहा कन्या शाळेत असलेल्या  परीक्षा केंद्रावर  ९६  विध्यर्थिनी परीक्षा देत आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षानंतर प्रथमच ऑफलाईन परीक्षा होते आहे.त्यामूळे दोन्ही केंद्रावर मास्क,  सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स इत्यादी नियमांचे पालन करून ही परीक्षा घेतली जाते आहे. आज सकाळी साडेदहा वाजता नीरा ग्रामपंचायतीचे सदस्य अनिल चव्हाण,प्रमोद काकडे,राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष तनुजा शहा, अड.आदेश गिरमे,अजित सोनवणे, पाटोळे सर  यांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी   दक्षता कमिटीचे  सदस्य राहुल शिंदे, भरत निगडे,मुहम्मदगौस आतार निरेचे  पोलीस पाटील राजेंद्र भास्कर, पोलीस कर्मचारी राजेंद्र भापकार,दोन्ही विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरख थिटे व निवेदिता  पासलकर, पर्यवेक्षक जयंतकुमार दाभाडे, उत्तम लोहकरे त्याचबरोबर शिक्षक,होमगार्ड पोलीस कर्मचारी उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?