वयोवृद्ध आणि लहान मुलांसाठी रेल्वेची खास सुविधा, ऐकून तुम्हालाही होईल आनंद!


 वी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

आता प्रवासादरम्यान, तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला तुमचे आवडते स्थानिक पदार्थ आणि प्रादेशिक खाद्यपदार्थ मिळणार आहेत.

भारतीय रेल्वेने आपली उपकंपनी सब्सिडियरी कंपनी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनला यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.

याअंतर्गत, रेल्वे मंत्रालयाने आयआरसीटीसीला खाद्यपदार्थांच्या मेनूमध्ये आवश्यक बदल करण्याची सवलत दिली आहे. जेणेकरुन प्रवाशांना प्रादेशिक खाद्यपदार्थ आणि प्राधान्यांवर आधारित सणांदरम्यान त्यांच्या आवडीनुसार जेवण मिळेल. याशिवाय, रेल्वेने ट्रेनमध्ये वृद्ध आणि लहान मुलांसाठी खास जेवण देण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. एवढेच नाही तर डायबिटिज रुग्णांसाठी शुगर फ्री जेवण, लहान मुलांसाठी बेबी फूड, स्थानिक उत्पादनांसह सकस आहार यांचा समावेश असेल. जेणेकरून प्रवाशांना सकस आहार मिळू शकेल.

या नवीन सुविधेअंतर्गत, प्रीपेड गाड्यांसाठी जेथे केटरिंग शुल्काचा प्रवासी भाड्यात समावेश केला जातो. आयआरसीटीसीद्वारे आधीच अधिसूचित दरामध्ये मेनू निश्चित केला जाईल. याशिवाय, या प्रीपेड गाड्यांमध्ये विविध खाद्यपदार्थ आणि एमआरपीवर ब्रँडेड खाद्यपदार्थ विकले जाऊ शकतात. अशा सर्व खाद्यपदार्थांचे मेनू आणि दर आयआरसीटीसीद्वारे तयार केले जातील.

दरात कोणताही बदल नाही
प्रवाशांसाठी मिळणाऱ्या या उत्तम सुविधेसाठी कोणतेही वेगळे अतिरिक्त शुल्क जोडले जाणार नाही. म्हणजेच दर यादी पूर्वीसारखीच राहील. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मेल/एक्स्प्रेस गाड्यांसाठी, मानक जेवणासारख्या बजेट श्रेणीतील खाद्यपदार्थांचा मेनू आयआरसीटीसी पूर्व-अधिसूचित दरामध्ये ठरवेल. याशिवाय जनता जेवणाच्या मेनू आणि दरात कोणताही बदल होणार नाही. मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांमध्ये ब्रँडेड खाद्यपदार्थांचे वेगवेगळे आयटम्स आणि खाद्यपदार्थांची एमआरपी विक्री करण्यास परवानगी असणार आहे.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?