पुणे 14 नोव्हेंबर : भीषण अपघाताची आणखी एक बातमी समोर आली आहे. हा अपघात दौंड-पाटस अष्टविनायक मार्गावर झाला आहे. रात्रीच्या वेळी झालेल्या या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
दुचाकी आणि उसाच्या ट्रॉलीच्या
धडकेत या तिघांचाही मृत्यू झाला आहेरात्रीच्या वेळी उसाने भरलेल्या ट्रॉलीला
दुचाकीने पाठीमागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की यात तीन तरुणांचा जागीच
मृत्यू झाला. उसाच्या ट्रॉलीला रिफ्लेक्टर बसविण्यासाठी पोलिसांकडून अनेक वेळा
जनजागृती केली जाते.
मात्र, तरीही ट्रॅक्टर चालक आणि मालक
याकडे सर्रास दुर्लक्ष करतात. याच कारणामुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावरुन प्रवास
करताना अनेकदा ट्रॅक्टरचा अंदाज येत आहे. उसाच्या ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर नसल्याने
अपघात झाल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. मात्र, तरीही या गोष्टीकडे गांभीर्याने
लक्ष दिलं जात नाही.
याच कारणामुळे ट्रॅक्टरचा अंदाज
न आल्याने अपघात होत आहेत. अशाच एका अपघातात आता या तीन तरुणांना आपला जीव गमवावा
लागला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर अपघात - मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर
ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला असल्याची घटना रविवारी रात्री समोर आली होती. या
अपघातात बसमधील प्रवासी मोठ्या प्रमाणात जखमी झाले. ट्रक आणि बसची समोरासमोर धडक
झाल्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर तिथले स्थानिक, हायवेवरून जाणारे प्रवासी आणि
पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केलं. खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीपासून 40 किमीच्या अंतरावर हा अपघात झाला
होता.