दर्शनासाठी आलेल्या भाविकांना खिचडी वाटप.

 दर्शनासाठी आलेल्या भाविकांना खिचडी वाटप.



नीरा : दि.१०

       आषाढी एकादशी निमित्त नीरा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले होते. नीरेतील भाविकांनी मोठय़ा श्रद्धेने विठ्ठल रुक्मिणीच्या पायावर नतमस्तक होऊन दर्शन घेतले. आज रविवारी सकाळी विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी मोठी रांग लागली होती त्यावेळी खिचडी वाटप करण्यात आले


पहाटे अॅड.आदेश गिरमे व मधुकर माने यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मुर्तीची विधिवत पुजा करण्यात आली. श्री ज्ञानेश्वरी पारायण व किर्तन महोत्सवात ट्रस्टच्या वतीने सकाळी फराळ वाटप करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रभुदयाळ अग्रवाल, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चव्हाण, चंदरराव धायगुडे, कल्याण जेधे, उत्तम घुले-पाटील, मदन चव्हाण, नंदकुमार महामूनी सुभाष पवार, सुदाम बंडगर, संभाजी जेधे, माणिक म्हस्के, सुरेश सप्काळ यांनी खिचडी वाटप केले. परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुपारी नीरा भजनी मंडळाच्या सदस्यांनी भजनाचा कार्यक्रम सादर केला. अॅड.आदेश गिरमे यांच्यावतीने मंदिरात आकर्षक फुलांची सजावट केली होती.



Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?