मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अलिंगन देत दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा
मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अलिंगन देत दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा
नीरा : दि.३
त्याग, सदभावना आणि मनशुद्धी करणाऱ्या मुस्लिम बांधवांची पवित्र रमजान ईद पुरंदर तालुक्यातील नीरा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ईदनिमित्ताने मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अलिंगन देत शुभेच्छा दिल्या.
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या नीरेतील स्टेशन मस्जिद येथे मौलाना हफीज मेराज यांच्या नेतृत्वाखाली ईदगाह मैदानात नमाज पठण करण्यात आली. तसेच अंजुमन तालीमुल कुरआन येथील मस्जिदमध्ये मौलाना *उवेज शेख* यांच्या नेतृत्वाखाली नमाज पठण करण्यात आली. यावेळी नीरा व परिसरातील मुस्लीम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. त्यावेळी मशिदीमध्ये मुस्लिम बांधवांच्या उन्नती, शांतता आणि एकात्मतेसाठी दुवा करण्यात आली. तसेच मोहंम्मद पैगंबर यांच्या शिकवणुकीला उजाळा देण्यात आला.
यावेळी स्टेशन मस्जिदमध्ये जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती दत्ता चव्हाण, माजी जि.प. सदस्य विराज काकडे, उपसरपंच राजेश काकडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, राजेश चव्हाण, दिपक काकडे, पोपट धायगुडे, नीरा पोलिस दुरक्षेत्राचे सहाय्यक फौजदार कैलास गोतपागर, पोलीस पाटील भास्कर जाधव, व पोलिस कर्मचारी यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. नीरा स्टेशन मस्जिदच्या पदाधिका-यांनी स्वागत केले.
Comments
Post a Comment