देवडी येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या


 देवडी येथे  एकाची गळफास घेऊन आत्महत्या 



 सासवड दि.2


पुरंदर तालुक्यातील देवडी येथे   एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असुन सुरज राजेंद्र शिंदे वय 22 वर्ष  रा.देवडी ता. पुरंदर जि. पुणे यांनी सासवड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.


 याबाबत सासवड पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दिंनाक  1/05/2022 रोजी दुपारी 4:00 वा. चे दरम्यान पुरंदर तालुक्यातील देवडी ता. पुरंदर जि. पुणे येथील फिर्यादी हे राहते घरी असताना त्यांच्या भाचीने त्यांना सांगीतले, की, तिचे बाबा कोठेतरी निघुन गेले आहेत. असे सांगीतल्याने  ते त्यांचे दाजी  युवराज लक्ष्मण गांधले वय 35 वर्ष मुळ रा. इनामगाव ता शिरुर जि पुणे सध्या रा. देवडी ता पुरंदर जि पुणे त्यांना  पाहण्यासाठी  त्याचे राहते घरी देवडी ता पुरंदर जि पुणे येथे गेले असता तेथील लोकांनी सांगीतले की युवराज लक्ष्मण गांधले वय 35 वर्ष याने  दोरीच्या सहायाने फाशी घेतली आहे त्यास लोकांनी खाली उतरावले आहे. तेव्हा फिर्यादी हे गावातील लोकांसोबत त्यास सरकारी दवाखाणा सासवड येथे घेऊन आले असता तेथील डॉक्टरांनी तपासुन मयत घोषित केले. याबाबतची माहिती त्यांनी सासवड पोलिसात दिली आहे.याबाबतचं अधिकचा तपास पोलीस हवालदार लियाकत मुजावर हे करीत आहेत

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?