एखतपूर येथील मुलीचा बारामती येथे हुंड्यासाठी छळ; सासवड पोलिसात पती आणि सासू, यांच्या विरोधात फिर्याद .
सासवड दि.१७
पुरंदर तालुक्यातील एखतपूर येथील मुलीचा हुंड्यासाठी मानसिक छळ केल्या प्रकरणी तिचा पती आणि सासू यांच्या विरोधात सासवड पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे.या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 498 (अ),34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,
या संदर्भात मूळची एखतपुर येथील असलेली व आता बारामती येथील सूर्यनगरीत राहणाऱ्या सौ.धनश्री स्वप्निल लोणकर या 22 वर्षीय तरुणीने सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे.तिने दिलेल्या फिर्यादी नुसार तिची सासू कुसूम शंकर लोणकर व पती स्वप्निल शंकर लोणकर हे तिला माहेरहून दोन तोळे सोन्याची ब्रँसलेट आणण्याची मागणी करत होते , ते आणले नाही म्हणून तिच्या चारीत्र्यावर सशंय घेवून तिला माणसिक त्रास देत होते.दिनांक १/१२/२०२१ ते दिनांक १२/०२/२०२२च्या दरम्यानचे काळात मौजे शिवरी व बारामती येथे हा त्रास त्यानीं तिला दिला. त्यामुळे तिने सासवड पोलिसात दिनांक १६/ १२/२०२२ रोजी फिर्याद दिली आहे.याबाबतचा अधिकचा तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोटे करीत आहेत.