डिजिटल मिडिया परिषदेच्या प्रदेश सहसचिव पदी राहुल शिंदे यांची निवड जाहीर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केले अभिनंदन
 
डिजिटल मिडिया परिषदेच्या प्रदेश सहसचिव पदी राहुल शिंदे यांची निवड जाहीर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केले अभिनंदन  मुंबई : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांच्या आदेशानुसार डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया परिषदेच्या प्रदेश सहसचिव पदी पुणे जिल्ह्यातील राहुल शिंदे यांची नियुक्ती जाहीर केली आहे.      अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा. श्री. एस. एम. देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात डिजिटल मिडिया परिषदेची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लवकरच राज्य, विभागीय आणि जिल्हा पातळीवर पदाधिकारी निवडी संदर्भांत एक व्यापक बैठक घेतली जाणार असल्याची माहिती सुद्धा प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य डिजिटल मिडिया परिषदेच्या प्रदेश सहसचिव पदी राहुल शिंदे यांची नुकतीच निवड जाहीर केली. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या व डिजिटल मिडिया परिषदेच्या सर्व राज्य स्तरीय अधिवेशने, विभागीय मेळावे, महत्वपूर्ण बैठ...
 
 
 
 
 
