कपडे धुणाऱ्या महिलांना जे दिसलं ते पाहून त्या हादरल्या

 

कपडे धुणाऱ्या महिलांना जे दिसलं ते पाहून त्या हादरल्या

 



पुणे: यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कासुर्डी (ता. दौंड) या गावात गरोदर असलेल्या अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या महिलेने आत्महत्या केली आहे की तिचा खून झाला आहे किंवा काही अपघात झाला आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. दरम्यान, ही महिला गरोदर असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासुर्डी गावच्या हद्दीत वाहत्या कालव्यात काही महिला कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. येळी एका महिलेला एक ३५ ते ४० वर्ष वय असलेली एक महिला ही पाण्यात वाहत आल्याचे दिसून आले. समोरचे दृश्य पाहून महिलांना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी ही बाब गावच्या पोलीस पाटील अश्विनी सोनवणे यांना दिली.

मिळालेल्या माहितीनुसार यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता पंचनामा करण्यात आला. त्यानंतर यवत पोलिसांनी सदर प्रेत हे यवत ग्रामीण

रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले. यावेळी सदर महिला हि ७ ते ८ महिन्यांची गरोदर असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. कालव्यात आढळलेली मृत महिला गरोदर आहे. त्या दृष्टीने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Comments

Popular posts from this blog

पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?