पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा..
पुरंदर विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वात आधी. याच लिंकवर वेळोवेळी अपडेट्स पहा.. पुरंदर : राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा ज्वर वाढत असतानाच पुरंदर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रशासकीय इमारत सासवड मध्ये होत आहे. पोस्टल मतदान मोजणीला सकाळी सुरवात झाली. यामध्ये पहिल्या फेरीत विजय शिवतारे 1,820 ने पुढे, शिवतारेंना 4727 मते संजय जगताप दुसऱ्या क्रमांकावर 2907 तर संभाजी झेंडे तीसऱ्या क्रमांकावर 1554 होते. शेवटच्या 30 व्या फेरी अखेर महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी 24 हजार 188 मतांनी आमदार संजय जगताप यांच्या वर दणदणीत विजय मिळवला आहे. पुरंदर विधानसभा निवडणुकीत यावर्षी विक्रमी ६१.०२ टक्के मतदान झाले होते. १६ उमेदवार आपले आमदारकीचे नशीब आजमावत असले तरी, महाविकास आघाडीतून कॉंग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप, महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, महायुतीतूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांच्यातच खरी ल...
Comments
Post a Comment