Type Here to Get Search Results !

जलजीवन बाबत तालुक्यातील ४१ गावातील गाव कारभारी उदासीन

Top Post Ad

 

जलजीवन बाबत  तालुक्यातील ४१ गावातील गाव कारभारी उदासीन



 कागदपत्रांची तातडीने पूर्तता करण्याची आमदार संजय जगताप यांची सुचना  

 सासवड दि.९

    पुरंदर तालुक्यातील ४१ गावांनी  जलजीवन योजने अंतर्गत होणाऱ्या योजनेसाठी विविध कागद पत्रांची पूर्तता केली नसल्याची माहिती पुढे आली आहे. या गावातील गाव कारभाऱ्यांनी तातडीने कागद पत्रांची पूर्तता करण्याच्या सुचना आ.संजय जगताप यांनी दिल्या आहेत.

       आज दिनांक ९ एप्रिल  रोजी सासवड येथे  आमदार संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी तालुक्यातील विविध भागात आगामी काळात पाणी टंचाई बाबत येणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाय योजना बाबत चर्चा करण्यात आली.यावेळी अनेक गावातील लोकांनी उन्हाळ्या मध्ये पाणी टंचाई बाबत माहिती देत, उपाय योजना करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. यावेळी  माजी उपसभापती गोरखनाथ माने,जिल्हा परिषद सदस्य  दत्ता झुरुंगे ,माजी जिल्हा परिषद सदस्य सुदाम इंगळे, सुनिता कोलते, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, तहसीलदार रुपाली सरनोबत, गटविकास अधिकारी अमर माने,पाणी पुरवठ्याचे अधिकारी सानप इत्यादी उपस्थित होते.

      यावेळी पाणी पुरवठा विभागाच्यावतीने तालूक्याती प्रस्थावित पाणी पुरवठा योजनांची माहिती देण्यात आली.राष्ट्रीय  जलजीवन योजनेतून प्रस्थावित असलेल्या ४१ गावांनी अद्याप कागद पत्रांची पूर्ततता केली नसल्याने या जोजना लवकर पूर्ण होत नसल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाकडून  देण्यात आली. या गावांची नावे व अपूर्ण कागदपत्रांची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी आमदार संजय जगताप यांनी सर्व गाव कारभाऱ्यांनी याबाबत पुढाकार घेऊन कागद पत्रांची पूर्तता करण्याचे  आवाहन केले.आपण दिरंगाई केली तर योजना रखडतील आणि त्यामुळे लोकांना याचा त्रास होईल अस त्यांनी म्हटले आहे.यासाठी गाव पातळीवर बैठका घेऊन मार्ग काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.    

Below Post Ad

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Hollywood Movies